फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात पुन्हा याचिका प्रविष्ट करणार ! – चित्रपट निर्मात्या रोशनी अली

रोशनी अली यांच्याच याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयाने घातली होती फटाके फोडण्यावर बंदी !

  • हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणाच्या नावाखाली न्यायालयात याचिका करणारे धर्मांध स्वधर्माच्या सणांच्या वेळी होणार्‍या प्रदूषणाच्या वेळी गप्प का बसतात ? यातून त्यांचा हिंदुद्वेषच स्पष्ट होतो, हे धर्मनिरपेक्षतेचा उदोउदो करणार्‍या हिंदूंना कधी लक्षात येणार ?
  • त्याच त्याच सूत्रांसाठी न्यायालयाचा अमूल्य वेळ घेणार्‍यांवर सरकारने कारवाईच केली पाहिजे, असे जनतेला वाटते !
कोलकाता उच्च न्यायालय

कोलकाता (बंगाल) – चित्रपट निर्मात्या रोशनी अली यांनी दिवाळी आणि श्री महाकाली देवीच्या पूजेच्या वेळी फटाके फोडण्यावर राज्यात बंदी घालण्यात यावी, यासाठी पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या याचिकेवर निकाल देतांना कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर या निकालाला फटाके उत्पादकांकडून आव्हान देण्यात आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी रहित केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने बंदी रहित केल्यानंतर रोशनी अली यांनी म्हटले की, माझी लढाई अद्याप संपलेली नाही. मी आताही माझ्या श्‍वास घेण्याच्या अधिकारासाठी लढणार आहे. हे केवळ पर्यावरणासाठी नाही, तर आपल्या व्यक्तीगत आरोग्यासाठी आहे. (याचप्रमाणे रोशन अली मशिदींवरील भोंग्यांवर देण्यात येणार्‍या अजानामुळे ध्वनीप्रदूषण होत असल्याचे सांगून भोंग्यांवरून अजान देण्यास बंदी घालण्याची याचिका प्रविष्ट करतील का ? – संपादक)