‘फेसबूक’ आस्थापनाचे नाव आता ‘मेटा’ !

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘फेसबूक’ या सामाजिक माध्यमाच्या आस्थापनेने त्याचे नाव पालटून आता ‘मेटा’ असे ठेवले आहे; मात्र या आस्थापनेच्या सामाजिक माध्यमाचे ‘फेसबूक’ हे नाव कायम ठेवण्यात आले आहे. फेसबूकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी आस्थापनाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली.