(म्हणे) त्रिपुरामध्ये आमच्या मुसलमान बांधवांसमवेत अमानुषता होत आहे ! – राहुल गांधी यांना कळवळा

‘मी दत्तात्रय गोत्राचा असून जानवे परिधान करणारा हिंदू आहे’, असे सांगणार्‍या राहुल गांधी यांना बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून अमानुष आक्रमण करण्यात आलेल्या हिंदूंचा कळवळा का आला नाही ? बांगलादेशमधील पीडित हिंदूंना त्यांनी ‘बांधव’ का संबोधले नाही ? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी आणि त्यांच्या हिंदुद्वेषी काँग्रेस पक्षाने दिली पाहिजेत ! – संपादक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

नवी देहली – त्रिपुरामध्ये आमच्या मुसलमान बांधवांशी अमानुष व्यवहार केला जात आहे. ‘हिंदु असण्याच्या नावाखाली द्वेष आणि हिंसा पसरवणारे खरे हिंदू नाहीत, तर ढोंगी आहेत. सरकार कधीपर्यंत आंधळे आणि बहिरे होण्याचे नाटक करत रहाणार आहे ?’, असे ट्वीट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्रिपुरा राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी भाजप सरकारवर टीका करतांना केले आहे. त्रिपुरामध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध करतांना काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वेळी मुसलमानांवर आक्रमणे झाल्याच्या घटनांविषयी त्यांनी हे ट्वीट केले आहे.