भारत-पाक क्रिकेट सामन्यात पाकच्या विजयाच्या घोषणा देणार्‍या ३ काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांना अधिवक्त्यांनी चोपले !

पाकच्या विजयाच्या घोषणा देणार्‍या ३ काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांना अधिवक्त्यांनी चोपले

आगरा (उत्तरप्रदेश) – भारत आणि पाक क्रिकेट सामन्यात पाकचा विजय झाल्यावर तो साजरा केल्याच्या प्रकरणी येथील ३ काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्यांना २९ ऑक्टोबर या दिवशी न्यायालयात आणण्यात आल्यावर उपस्थित अधिवक्त्यांकडून चोपण्यात आल्याची घटना घडली. या वेळी अधिवक्त्यांनी ‘भारतमाता की जय’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या.

भारत सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे विनामूल्य शिक्षण घेऊन करतात देशद्रोह !

सरकारने आता सर्वच काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांच्या देशप्रेमाची पडताळणी केली पाहिजे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? – संपादक

अर्शद युसूफ, इनायत अल्ताफ आणि शौकत अहमद अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे विद्यार्थी पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहेत. या योजनेमध्ये या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्यासमवेत शिक्षण पूर्ण झाल्यावर १ लाख रुपयेही देण्यात येतात.