पाक क्रिकेट संघाच्या विजय साजरा करतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणारी जम्मू येथील वैद्यकीय महिला कर्मचारी नोकरीतून बडफर्त

जम्मूतील वैद्यकीय महाविद्यालयात साजरा करण्यात आला होता पाकचा विजय !

भारतात राहून पाकचा विजय साजरा करणार्‍यांना सरकार पाकमध्येच का हाकलून देत नाही ? – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू – येथील राजौरी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी साफिया मजीद यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत नुकताच भारतविरूद्ध पाकचा विजय झाल्यावर साफिया यांनी या वैद्यकीय महाविलयातील विद्यार्थिनी पाकचा विजय साजरा करतांनाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित केला होता.