हिंदुद्वेषी ‘वैचारिक’ जिहाद !

‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन’ (डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व) हा द्वेषावर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमही अशाच ‘जिहाद’चा प्रकार गेल्या मासात पार पडला. त्यामध्ये सहभागी झालेल्या विविध विद्वानांनी त्यांच्या विद्वत्तेचे दर्शन घडवून त्यांच्या बुद्धीची पातळी किती आहे ? हे जगाला दाखवून दिले.

‘आश्रम’ मालिकेवर तत्परतेने बंदी घाला !

मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंच्या पवित्र आश्रमसंस्कृतीचे अश्लाघ्य चित्रण करणार्‍या ‘आश्रम-३’ वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळाची तोडफोड केली. ‘सातत्याने हिंदु धर्माचा घोर अवमान होत असतांना आणि तो थांबतच नसतांना किती काळ हिंदूंनी ते सहन करायचे ?’

पुणे येथील महालक्ष्मी प्रतिष्ठान मंदिरात चोरी

डोबरवाडी (घोरपडी) येथील श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान मंदिरातील दानपेटीतून २ सहस्र रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १६ सहस्र ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

निवडणुकांचा लाभ कुणाला ?

निवडणुकीत मतदारांना विविध आमिषे दाखवून विजयी होणारे लोकप्रतिनिधी पुन्हा त्या मतदारसंघात जात नाहीत, जनतेची विकासकामे करत नाहीत, त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, हे चित्र सर्रास पहायला मिळते. या लोकप्रतिनिधींना ठाऊक असते की, त्यांनी या मतदारांना खरेदी केले आहे, त्यामुळे मला कुणी काही विचारू शकत नाही.

सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठारावर जैविक कचरा जाळण्याचा प्रकार !

जागतिक वारसा स्थळ असणार्‍या सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठाराच्या निसर्गरम्य परिसरामध्ये २० ऑक्टोबर या दिवशी जैविक कचरा आणून जाळण्यात आला.

‘प्लॉगेथॉन’ मोहिमेत ५५ सहस्र पुणेकरांचा सहभाग !

‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंतर्गत ‘प्लॉगेथॉन २०२१’चे आयोजन करण्यात आले होते. चालता चालता कचरा गोळा करण्याच्या उद्देशाने राबवलेल्या मोहिमेत ५५ सहस्र २२७ पुणेकरांनी सहभाग नोंदवून ५७ सहस्र ५६९ किलो प्लास्टिक आणि इतर सुका कचरा संकलित केला.

चीनचे संस्कृतीप्रेम जाणा !

चीनमध्ये आता मशिदींचे घुमट आणि मिनार हटवण्यात येत असून त्या ठिकाणी चिनी पद्धतीने रचना करण्यात येत आहे. ‘ही प्रतिके मध्यपूर्व आशियातील इस्लामीकरणाचा भाग वाटू नये; म्हणून असे करण्यात येत आहे’, असे सरकारने म्हटले आहे.

राज्यघटना सर्वांची असल्याने देशातील बहुसंख्य हिंदूंचे म्हणणे ऐकले गेले पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

राज्यघटना सर्वाेच्च असल्याचे आज वारंवार सांगितले जाते. तिची शपथ घेऊन प्रत्येक खासदार, पोलीस आणि समाज तिच्या रक्षणाचा दावा करतात; मात्र प्रत्यक्षात याचे महत्त्व राहिले आहे का ? गेल्या वर्षी राज्यसभेच्या अध्यक्षांनी कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्षाच्या खासदारांनी केलेल्या रेल्वे तिकीट घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

कौटिल्याने मांडलेला उत्तम राज्यव्यवस्थेचा सिद्धांत !

कौटिल्याने स्वत:च्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात ‘राज्य’ या संकल्पनेस मानवी शरिराची उपमा दिली.

गुरुपुष्यामृतयोग

‘गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृतयोग’ होतो. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे’, असा प्रघात आहे. सर्व लौकिक किंवा व्यावहारिक कार्यांसाठी हा योग शुभ मानला जातो. एका वर्षात साधारण ३ किंवा ४ वेळा हा योग येतो.