‘कुंभमेळा’ याविषयीची शास्त्रीय माहिती
कुंभपर्व हे अतिशय पुण्यकारक असल्यामुळे त्या वेळी स्नानाला विशेष महत्त्व आहे. हरिद्वार येथे गंगा नदीच्या तिरावर, प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि अदृश्य स्वरूपात असलेली सरस्वती या नद्यांच्या संगमावर, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या तिरावर, तर उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या तिरावर कुंभपर्वात स्नान करतात. कुंभपर्वात तीर्थक्षेत्री स्नान केल्याने पापक्षालन होऊन पुण्यफळ प्राप्त होते.