मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट !

‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील कारवाईच्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या प्रकरणी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

(म्हणे) ‘कॉ. पानसरे हत्येचे अन्वेषण ‘ए.टी.एस्.’कडे सोपवा !’ – भाकपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 

अन्वेषणातून स्वतःला हवा तसा निष्कर्ष न मिळाल्यामुळे साम्यवादी थयथयाट करत आहेत. या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांचा हात नसल्याचे पुढे आल्याने साम्यवाद्यांचे पित्त खवळले असून त्यामुळेच ते अशी मागणी करत आहेत. हिंदुद्वेषापोटी हे निवेदन दिले गेले आहे, हे हिंदू जाणून आहेत !

नागपूर विद्यापिठाच्या विधीसभेची ‘ऑनलाईन’ बैठक तांत्रिक कारणामुळे एका घंट्यातच थांबवली !

शतकोत्तर वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या विधीसभेची ‘ऑनलाईन’ बैठक तांत्रिक कारणाने एका घंट्यातच थांबवण्यात आली. यावर सदस्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली.

आर्यन खान याच्या जामिनावर २७ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी होणार !

अमली पदार्थविरोधी पथकाच्या ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील कारवाईच्या प्रकरणात २६ ऑक्टोबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी आरोपींच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली.

उत्पादनाअभावी अमरावती येथे शेतकर्‍याने संत्र्याच्या ५०० झाडांवर चालवला बुलडोझर !

उत्पादन होत नसल्याने जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील संजय आवारे या शेतकर्‍याने स्वतःच्या ४ एकर संत्र्याच्या बागेतील ५०० झाडांवर बुलडोझर चालून बाग नष्ट केली. त्यांनी १४ वर्षांपूर्वी संत्राच्या झाडांची लागवड केली होती.

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा नियोजित कार्यक्रम रहित करावा !

हिंदु जनजागृती समितीची प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे मागणी !

एस्.टी. महामंडळाने १७ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला !

इंधन दरवाढ, नियमित उत्पन्नातील घट, त्यात कोरोना संसर्गाच्या कालावधीतील आर्थिक फटका यांमुळे महामंडळाला देखभाल-दुरुस्तीसह कर्मचार्‍यांचे वेतन देण्यात अडचण येत आहे. यावर उपाय म्हणून ही भाडेवाढ असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील वसतीगृहांतील खानावळी बंद असल्याने विद्यार्थ्यांची उपासमार !

विद्यार्थ्यांची हेळसांड करणार्‍या सामाजिक न्याय विभागातील उत्तरदायी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

काहींना स्वार्थ साधता येत नसल्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप !

अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप !

मुंबईत १४ कोटी रुपयांचे काश्मिरी चरस कह्यात !

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दहिसर पडताळणी नाका (चेकनाका) येथे एका गाडीतून २४ किलो काश्मिरी चरस कह्यात घेतले आहे. या चरसचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात १४ कोटी ४४ रुपये इतके आहे.