‘प्लॉगेथॉन’ मोहिमेत ५५ सहस्र पुणेकरांचा सहभाग !

(टीप – ‘प्लॉगेथॉन’ म्हणजे चालता चालता कचरा गोळा करण्याच्या उद्देशाने राबवलेली मोहीम)

‘प्लॉगेथॉन २०२१’ मोहिमेत सहभागी पुणेकर

पुणे – ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंतर्गत ‘प्लॉगेथॉन २०२१’चे आयोजन करण्यात आले होते. चालता चालता कचरा गोळा करण्याच्या उद्देशाने राबवलेल्या मोहिमेत ५५ सहस्र २२७ पुणेकरांनी सहभाग नोंदवून ५७ सहस्र ५६९ किलो प्लास्टिक आणि इतर सुका कचरा संकलित केला. यानिमित्त काढलेल्या ‘सायकल फेरी’त महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी सहभाग नोंदवला. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३५ सहस्र २१६ नागरिक, स्वयंसेवी संस्था, शहरातील ३११ महापालिकेच्या आणि खासगी शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ‘हास्य क्लब’चे सदस्य, अन्य नागरिक हे मोहिमेत सहभागी झाले. भिडे पूल परिसरातील नदीपात्रात जमून स्वच्छतेची शपथ घेऊन उपक्रमाचा शेवट झाला.