अतीवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात लाखो हेक्टर शेतातील पिकांची हानी !

कृषी विभागाच्या अहवालानुसार पावणेचार लाख हेक्टर शेतीची हानी असली, तरी ‘यापेक्षाही अधिक हानी झाली आहे’, असे कृषी तज्ञांचे मत आहे. पिकांची सर्वाधिक हानी बुलढाणा जिल्ह्यात झाली आहे.

मये भूविमोचन कृती समिती विधानसभेची निवडणूक लढवणार

मये येथील स्थलांतरित मालमत्ता प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी शासनाने कायदा करूनही स्थानिकांना अद्याप भूमीचे हक्क मिळालेले नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्याकडून केवळ आश्वासनेच मिळत आहेत.

‘शाळा पुन्हा बंद करायच्या नाहीत’, या निर्धाराने शिक्षण चालू ठेवू ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्यातील शाळा पुन्हा चालू होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद !

सोलापूर जिल्ह्यातील १ सहस्र ९८० शाळा चालू !

राज्यशासनाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील १ सहस्र ९८० शाळा चालू झाल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ‘ई-दर्शन पास’ असलेल्यांनाच दर्शन मिळणार !

नवरात्रीत पहिल्या दिवशी म्हणजे ७ ऑक्टोबरपासून साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले श्री महालक्ष्मी मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे. श्री महालक्ष्मी मंदिरात केवळ ‘ई-दर्शन पास’ असलेल्यांना दर्शन मिळणार आहे.

श्री कालिकादेवी मंदिरातील ‘टोकन’ पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे निःशुल्क दर्शन चालू करा !

हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडे मागणी, भक्त आणि भाविक यांना देवतेचे दर्शन प्रशासनाने नि:शुल्कच उपलब्ध करावे !

मुंबई उच्च न्यायालयात कोपर्डी खटल्याची सुनावणी न करण्याच्या न्यायाधिशांच्या शेर्‍यामुळे सुनावणी स्थगित !

१३ जुलै २०१६ या दिवशी कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली. घटनेचे गांभीर्य पाहून या खटल्याचे वेगाने अन्वेषण करण्यात आले आणि खटलाही चालवण्यास घेण्यात आला.

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचे मंदिर २५ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुले होणार

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचे मंदिर ७ ऑक्टोबरऐवजी २५ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी उघडण्यात येणार आहे.

रस्ते आणि उद्यान यांच्या भिंती सुशोभित करण्याच्या कामासाठी अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील रस्ते आणि उद्यान यांच्या भिंती विशेष संकल्पनांवर आधारित ‘ग्राफिटी वॉल’ आणि प्रतिकृती यांचा वापर करून सुशोभिकरण केल्या जाणार आहेत.