फेसबूकवर ओळख झालेल्या २ अल्पवयीन मुलींचे मित्रांसमवेत पलायन !

२ अल्यवयीन मुली मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात असल्याचे कारण सांगून घरातून बाहेर पडल्या आणि फेसबूकच्या माध्यमातून ओळख झालेल्या मित्रांकडे वर्धा रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी जाऊन तेथून पसार झाल्या.

शेतकर्‍यांच्या विरोधात जाणार्‍यांचा पराभव होणार ! – बच्चू कडू, राज्यमंत्री

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा ५ ऑक्टोबर या दिवशी निकाल लागला. यात परिवर्तन आणि सहकार पॅनल यांच्यात झालेल्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांचे ‘परिवर्तन पॅनेल’ विजयी झाले आहे.

माण नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक !

सातारा-म्हसवड-लातूर महामार्गावरील माण नदीवरील जुन्या पुलाचे रुंदीकरणाचे काम अपूर्णावस्थेत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

देगलूर (नांदेड) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना पक्षप्रवेशापूर्वीच भाजपची उमेदवारी !

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष पिराजी साबणे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ४ ऑक्टोबर या दिवशी त्यांची उमेदवारी अधिकृतरित्या घोषित केली आहे.

अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा नोंद

समाजात झपाट्याने होत असलेल्या नीतीमत्तेच्या र्‍हासाचा दुष्परिणाम !

शेतकर्‍यांनो उपाययोजना काढा !

एकामागोमाग येणारी संकटे पहाता शेतकर्‍यांना एव्हाना शासनाकडून समाधानकारक साहाय्य मिळणे अपेक्षित होते; परंतु असे झाले नाही, हे दुर्दैवी आहे.

वाहन अडवण्यासाठी बोनेटवर चढलेल्या पोलिसाला चालकाने फरफटत नेले !

अंधेरी (पश्चिम) येथील आझादनगर मेट्रो स्थानकाच्या खाली प्रवेश निषिद्ध असलेल्या रस्त्यावर वाहन थांबवण्याच्या प्रयत्नात गाडीच्या ‘बोनेट’वर चढलेल्या वाहतूक पोलिसाला चालकाने तसेच फरफटत नेले.

बारामती येथे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !

असे पोलीस गुन्हेगारांना शिक्षा कशी करणार ? लाचखोरी मुळापासून नष्ट करण्यासाठी कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिसांची भरती करणे हाच एकमेव पर्याय आहे !

मुंबई येथील अल्पवयीन मुलीस जालना येथे बोलावून अत्याचार करणार्‍या तिघांना अटक !

मुली आणि तरुणी यांनी सतर्कता बाळगून अशा वासनांधांना धडा शिकवायला हवा !

हिंदूंची अवहेलना करणारे बंगाल सरकार विसर्जित करा !

बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारने पीडित हिंदूंना अजूनपर्यंत हानीभरपाई दिलेली नाही…..