चिंचवड (पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील रस्ते आणि उद्यान यांच्या भिंती विशेष संकल्पनांवर आधारित ‘ग्राफिटी वॉल’ आणि प्रतिकृती यांचा वापर करून सुशोभिकरण केल्या जाणार आहेत. या कामासाठी वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपये गृहीत धरून ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या विविध प्रकारच्या योजनांच्या अनुषंगाने विविध संदेशपर भित्तीचित्र रंगवण्याची कामे करण्यात येणार आहेत. ही कामे करण्यासाठी पुण्यातील ६ तज्ञ सल्लागारांनी संमती दर्शवली आहे.