अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम

स्तोत्रपठण ‘तदर्थभावपूर्वक = तत् + अर्थ + भावपूर्वक’, म्हणजे ‘त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह’ झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्त झाला पाहिजे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना भारताच्या विरोधात वापरण्याची आय.एस्.आय.ची सिद्धता  !

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चे षड्यंत्र उघड, पाकच्या या कारवाया कायमस्वरूपी थांबवण्यासाठी पाकला नष्ट करणे अत्यावश्यक आहे, हे भारताला समजेल, तो सुदिन !

अयोद्धेतील दीपोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाण्याची शक्यता

वर्ष २०१७ मध्ये उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रारंभ केला होता. त्यामुळे अयोध्येतील हा ५ वा दीपोत्सव असणार आहे. या दीपोत्सवामध्ये ७ सहस्र ५०० स्वयंसेवकांच्या साहाय्याने ७ लाख ५० सहस्र दीप प्रज्वलित केले जाणार आहेत.

राजस्थानच्या मुसलमानबहुल मालपुरा भागातून शेकडो हिंदूंचे पलायन !

काँग्रेस सत्तेवर असलेल्या राजस्थानमध्ये हिंदूंवर अशी वेळ आल्यास आश्‍चर्य ते काय ?  या प्रकरणात केंद्रातील भाजप सरकारने थेट हस्तक्षेप करून तेथील हिंदूंना आश्‍वस्त करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

श्री रेणुकादेवीप्रती भक्तीभाव असणारे, राणीसावरगाव (जिल्हा परभणी) येथील श्री. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर) (वय ८६ वर्षे) संतपदी विराजमान !

सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी पू. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर) यांचा सन्मान सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र देऊन केला. या घरगुती कार्यक्रमामध्ये त्यांचे काही नातेवाईक उपस्थित होते.

(म्हणे) ‘तमिळनाडूतील मंदिरातील सोने बँकेत ठेवून त्यातून येणार्‍या व्याजाची रक्कम मंदिरांच्या पायाभूत सुविधांसाठी वापरली जाईल !’  पी.के. सेकरबाबू

‘मशिदी आणि चर्च यांचे सरकारीकरण करून त्यांच्या पैसा पायाभूत सुविधांसाठी वापरण्याचा विचार धर्मनिरपेक्ष सरकारकडून का केला जात नाही ?’ या प्रश्‍नाचे उत्तर द्रमुक सरकार देणार का ?

पुणे येथील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’चे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते होणार श्रींची प्राणप्रतिष्ठापना !

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या वतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षानिमित्त १० सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

पुणे येथील मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना यंदाही साधेपणाने !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या गणेशोत्सव मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने यंदाही उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. मानाच्या ५ गणपतींसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना १० सप्टेंबर या दिवशी दुपारपर्यंत होणार आहे.