|
|
जयपूर – राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील मालपुरामध्ये हिंदु कुटुंबांवर यांची घरे आणि दुकाने विकून पलायन करण्याची वेळ आली आहे. मुसलमानबहुल भागात रहाणार्या हिंदूंनी त्यांच्या घरांच्या बाहेर ‘आम्ही हतबल असल्याने कुटुंबासह पलायन करावे लागत आहे’ अशी भित्तीपत्रके लावली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी हिंदूंनी शहरामध्ये मोर्चा काढला. (हिंदूबहुल भारतात हिंदूंना सुरक्षित रहाण्यासाठी असे मोर्चे काढावे लागतात, हे लज्जास्पद ! – संपादक) असुरक्षित वातावरण आणि भीती यांमुळे मालपुरा येथील हिंदूंनी त्यांची घरे विक्रीला काढली आहेत. आतापर्यंत हिंदूंनी ६०० ते ८०० घरे मुसलमानांना विकल्याचे म्हटले जात आहे.
‘Meat shops being operated near temples, women being molested’: 200 Hindus forced to sell houses and escape Tonk district in Rajasthanhttps://t.co/pUMvgPXqpX
— OpIndia.com (@OpIndia_com) September 9, 2021
१. हिंदूंनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनामध्ये त्यांनी या भागात त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराची व्यथा सांगितली.
२. निवेदनात म्हटले आहे की, मालपुरामध्ये हिंदूंना मारहाण केली जाते आणि महिलांशी असभ्य वर्तन केले जाते. वर्ष १९९२ पासून मुसलमान वस्ती जवळ रहाणार्या हिंदूंनी हळूहळू पलायन केले आहे.
३. मुसलमानांकडून मंदिरांच्या जवळ अवैधरित्या मांसाची दुकाने चालवली जातात. त्यामुळे मंदिरांच्या मूर्तींचे स्थानांतर करण्यात येत आहे.
प्रशासनाची हिंदुद्वेषी भूमिका !
या मोर्चानंतर प्रशासनाने हिंदूंना न्याय देण्याऐवजी धार्मिक सौहार्द बिघडवण्यात हिंदूंना उत्तरदायी ठरवले आहे. प्रशासनाने हिंदूंना त्यांच्या घरावरील ‘पलायना’ची भित्तीपत्रके काढण्याची चेतावणी दिली. त्यानंतर पोलीसदलाने हिंदूंच्या घरोघरी जाऊन भित्तीपत्रके काढण्याचा प्रयत्न केला; परंतु विरोधामुळे त्यांना ते करता आले नाही.
मालपुरा हा भाग धार्मिकदृष्ट्या संवेदनशील समजला जातो. तेथे पूर्वी झालेल्या तणावाच्या स्थितीमुळे ५० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. आतापर्यंत २०० हिंदु कुटुंबांनी सुरक्षा देण्याची मागणी केली आहे; परंतु त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली नाही. (हिंदूंच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारे हिंदुद्वेष्टे प्रशासन आणि काँग्रेस सरकार ! – संपादक)