काश्मिरी नेते सुशील पंडित यांच्यावरील गुन्हा रहित !

काश्मिरी नेते सुशील पंडित

जम्मू – देहलीमध्ये २१ मे २०१८ या दिवशी एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात एका नेत्याने काश्मीरच्या बारामुला येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात ५ सैनिक हुतात्मा झाल्याचे सांगितल्यावर काश्मिरी नेते सुशील पंडित यांनी ट्वीट केले होते. प्रत्यक्षात अशी घटना घडली नव्हती. त्यामुळे पंडित यांनी हे ट्वीट ‘डिलीट’ही (काढलेही) केले; मात्र त्यापूर्वी पंपोर पोलीस ठाण्यात पंडित यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पंडित यांनी हा गुन्हा रहित करण्याची जम्मू उच्च न्यायालयात मागणी केली होती. ती मान्य करून गुन्हा रहित करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.