कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी केलेल्या अर्जासमवेत मृत्यूचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही ! – गोवा शासनाचा निर्णय

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना शासनाकडून देण्यात येणार्‍या २ लाख रुपये आर्थिक साहाय्य योजनेसाठी अर्ज करतांना अर्जासमवेत कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही, अशी घोषणा शासनाने केली आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी हंगामी स्वरूपात घेतलेल्या कर्मचार्‍यांना अद्याप वेतन नाही

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी हंगामी स्वरूपात भरती केलेल्या ४३० एम्.टी.एस्.(मल्टिटास्किंग) कर्मचार्‍यांपैकी बहुतेक जणांना गेल्या ५ मासांपासून वेतन मिळालेले नाही. या कर्मचार्‍यांना मासिक १७ सहस्र रुपये वेतन देण्यात येणार होते. हे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.

गुरांची अवैधपणे होणारी हत्या आणि ‘धिरयो’ रोखण्यासंबंधी मडगाव येथे दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन !

अवैधरित्या करण्यात येणारी गुरांची हत्या आणि आयोजित केल्या जाणार्‍या धिरयो (बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजी) यातून मुक्या प्राण्यांना सहन करावे लागणारे हाल रोखण्यासंदर्भात पशूसंवर्धन खात्याने दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात एक सत्र आयोजित केले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर ‘सनातन प्रभात’मध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’

२१ बँकांमधील कोट्यवधी ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा भरपाई मिळणार !

विमा महामंडळाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत झाल्यानंतर संबंधित बँकांना विमा भरपाईसाठीची आवश्यक छाननी प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हिंदु धर्माला धोका नाही ! – माहिती अधिकारातील प्रश्नाला केंद्र सरकारचे उत्तर

जबलपुरे यांनी ३१ ऑगस्ट या दिवशी माहिती अधिकार कायद्यांतर्गत हिंदु धर्माला धोका असल्याविषयीची माहिती मागितली होती. यावर गृह मंत्रालयाचे मुख्य माहिती अधिकारी (अंतर्गत सुरक्षा) व्ही.एस्. राणा यांनी वरील उत्तर दिले आहे.  

श्री साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकार्‍यांसह ६ जणांना अटक !

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानची सामाजिक माध्यमांतून अपर्कीती केल्याचे प्रकरण, मंदिरांच्या विश्वस्त मंडळावर केवळ भक्तांचीच नियुक्ती करणे आवश्यक !

मुलांची संख्या अल्प झाल्याने १४ सरकारी प्राथमिक शाळा बंद !

सरकारी प्राथमिक शाळांपैकी पेडणे तालुक्यातील ४, डिचोली तालुक्यातील ३, फोंडा, सांगे आणि केपे या तालुक्यांतील प्रत्येकी २ आणि तिसवाडी तालुक्यातील १, अशा एकूण १४ शाळा बंद झाल्या आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट !

अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे निर्णय घेण्याचे धाडस प्रशासन कधी दाखवते का ?

केक संस्कृतीची पद्धत बंद करण्यासाठी हडपसर (पुणे) येथील शेखर(दादा) मोडक यांची ‘माझा वाढदिवस, माझी गोसेवा’ ही अभिनव संकल्पना !

गोशाळेतील गायी-वासरांना चारा किंवा देणगी स्वरूपातील सेवा देऊन वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन !