काश्मीरमध्ये दोन चकमकीत ४ आतंकवादी ठार

५ एके-४७ रायफल, ५ पिस्तूल आणि ७० ग्रेनेड जप्त

३-४ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, तर त्यासाठी त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे आवश्यक ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

उरी (जम्मू-काश्मीर) – येथील रामपूर सेक्टरजवळील सीमेवर घुसखोरी करणार्‍या ३ जिहादी आतंकवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले. त्यांच्याकडून ५ एके-४७ रायफल, ५ पिस्तूल आणि ७० ग्रेनेड जप्त करण्यात आले. येथील जंगलामध्ये ६ आतंकवादी लपल्याची माहिती सैन्याला मिळाल्यावर चालू करण्यात आलेल्या शोधमोहीमेच्या वेळी आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यावर झालेल्या चकमकीत हे आतंकवादी ठार झाले. अन्य ३ आतंकवादी तेथून पळून गेले. त्यांचा सैनिकांकडून शोध घेण्यात येत आहे. या चकमकीपूर्वी शोपिया येथील चित्रगाम गावात झालेल्या अन्य एका चकमकीत अनायत अहमद डार हा आतंकवादी ठार झाला.