अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे साधू मणिराम दास यांचा मंदिराच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली पडून मृत्यू

संशयास्पद मृत्यूमुळे पोलिसांकडून चौकशी चालू

साधु मणिराम दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील मणिराम दास या साधूंचा श्री राम मंत्रार्थ मंडपम् मंदिराच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली पडून संशयास्पदरित्या मृत्यू झाला. पोलीस या मृत्यूचे अन्वेषण करत आहेत. ही हत्या आहे, आत्महत्या आहे कि अघपात आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. मृत्यूच्या काही दिवस आधीपासून मणिराम दास यांनी लोकांशी बोलणे अल्प केले होते. ते तणावामध्येही दिसत होते. त्यांनी बोलणे का अल्प केले होते, याविषयी कुणालाच ठाऊक नसल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणी मंदिराच्या अन्य दोघा साधूंचीही चौकशी करत आहेत.