हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त  श्री गणेशपूजाविधीविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचन

गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी गणपतीविषयी शास्त्रीय माहिती सांगितली.

दंडाधिकारी न्यायालय पक्षपाती असून त्याच्यावर माझा विश्वास नाही ! – कंगना राणावत, अभिनेत्री

राणावत यांचे अधिवक्ता रिझवान सिद्दिकी यांनी न्यायालयात सांगितले की, आमच्या अशिलास या न्यायालयात प्रकरण पुढे चालू ठेवायचे नाही. आम्ही ‘चिफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट’च्या न्यायालयात अर्ज केला आहे.

धर्मांतर करणार्‍यांना पंचायत निवडणूक लढवता येणार नाही ! – जनजाती सुरक्षा मंचाची चेतावणी

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा केल्यास अशी चेतावणी  देण्याची वेळ कोणत्याच संघटनेवर येणार नाही, हेही तितकेच खरे !

राज कुंद्रा यांची ५० सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता !

अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले उद्योजक राज कुंद्रा यांची न्यायालयाने ५० सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.

नवरात्रोत्सवामध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची उंची ४ फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या शासनाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यास ओडिशा उच्च न्यायालयाचा नकार !

श्री दुर्गादेवीची ८ फुटांपर्यंतची मूर्ती बनवण्याची मागणी करणारी याचिका बालू बाजार पूजा कमिटीकडून न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती.

सनातन संस्थेच्या वतीने फरिदाबाद (हरियाणा)  येथे श्री गणेशाविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. सुमन खुराना यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्त त्यांच्याकडे सनातन संस्थेच्या वतीने गणेशाविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले.

गोहत्या प्रकरणामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच एका गोहत्या प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते, ‘आम्हाला ठाऊक आहे की, जेव्हा एखाद्या देशाची श्रद्धा आणि संस्कृती यांना धक्का पोहोचतो, तेव्हा देश दुर्बल होतो.’

विदर्भाच्या काही भागांत २ दिवस अतीवृष्टीची चेतावणी !

जिल्ह्यातील धरणे भरली असल्याने पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिला सुरक्षेच्या प्रश्नी २ दिवसांचे अधिवेशन घ्यावे !

साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना २ दिवसीय अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात राज्यपालांनी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले आहेत.

चेन्नई येथून अपहरण करण्यात आलेल्या बालकाची नागपूर येथे सुटका !

या प्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली असून मोनू गरीबदास केवट आणि शिब्बू गुड्डू केवट, अशी या आरोपींची नावे आहेत.