पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता !
नागपूर – नागपूरसह विदर्भाच्या काही भागांत पुढील २ दिवस अतीवृष्टीची चेतावणी भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील धरणे भरली असल्याने पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नदीच्या शेजारी असलेल्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. नदीकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसमवेत ‘धोकादायक ठिकाणी किंवा दरड कोसळणार्या ठिकाणी थांबू नका’, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील धरणक्षेत्रांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यातील धरणे बर्यापैकी भरलेली आहेत.