भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशा उच्च न्यायालयाने नवरात्रोत्सवामध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची उंची ४ फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या राज्यशासनाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. श्री दुर्गादेवीची ८ फुटांपर्यंतची मूर्ती बनवण्याची मागणी करणारी याचिका बालू बाजार पूजा कमिटीकडून न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला.
न्यायालयाने म्हटले की, गेल्या वर्षी मूर्तीची उंची मर्यादित ठेवण्याचा आदेश विलंबाने जारी आला होता. तोपर्यंत अनेक पूजा समित्यांनी मूर्ती बनवल्या होत्या. त्यामुळे ४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींना अनुमती देण्यात आली होती. यावर्षी मात्र ऑगस्टमध्येच आदेश देण्यात आल्याने सूट देता येणार नाही.