‘ॲमेझॉन’कडून ६०० चिनी आस्थापनांवर कायमची बंदी !

ॲमेझॉनने स्पष्ट केले आहे की, ही चीनला ‘लक्ष्य’ करण्याची मोहीम नसून ती एक जागतिक मोहीम आहे. आम्ही चुकीची कृत्ये करणार्‍यांवर कारवाई करणे चालूच ठेवू.

गुजरातमधील मुंद्रा बंदरावरील कंटेनरमधून ९ सहस्र कोटी रुपयांचे ३ सहस्र किलो हेरॉईन जप्त !

हेरॉईन घेऊन जाणारे कंटेनर आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील एका आस्थापनाने आयात केले होते. या आस्थापनाने कंटेनरमध्ये ‘टॅल्कम पावडर’ असल्याचा बनाव केला होता.

हिंदूंना धर्मज्ञान देण्याचे सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य ! – श्री श्री विदुशेखर भारती महास्वामीजी, उत्तराधिकारी, श्रृंगेरी श्री शारदा पीठ

आम्ही अनेक वर्षांपासून सनातनच्या संपर्कात आहोत. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले चालू आहे, असे गौरवोद्गार दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कन्याडी येथील श्री श्री श्री सद्गुरु ब्रह्मानंद सरस्वती महाराज यांनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी काढले.

पाकमध्ये मशिदीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या हिंदु कुटुंबाला धर्मांधांकडून मारहाण !

राम भील असे या कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव आहे. ते आणि त्यांचे कुटुंबीय मशिदीजवळील शेतामध्ये काम करत होते. या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही

रशियातील पर्म विश्वविद्यालयामधील गोळीबारात ८ जणांचा मृत्यू !

गोळीबारामुळे अनेक विद्यार्थ्यांनी विश्वविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली उड्या मारून पळण्याचा प्रयत्न केला. आक्रमणकर्त्याचे नाव टिमूर असून तो १८ वर्षांचा आहे.

काँग्रेसच्याही दोन नेत्यांचे घोटाळे उघड करणार ! – चंद्रकांत पाटील

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता.

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केल्याने पुण्यात अनेक ठिकाणी भाविकांना श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रात देणे, तसेच फिरत्या हौदात विसर्जन करणे भाग पडले !

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या नियोजनाचा पुणे महापालिकेचा बोजवारा !

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कह्यात घेऊन सोडले !

लोकशाहीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणार्‍याला अटक केली जात आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केला.

मुंबईतून आणखी एका आतंकवाद्याला अटक

देहली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अतिरेक्यांनी १९९३ या वर्षी मुंबईमध्ये ज्या प्रकारे बाँबस्फोट केले होते, त्या धर्तीवर बाँबस्फोट करण्याचा कट रचला होता.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी ‘गोवा मायनिंग पीपल्स फ्रंट’ निवडणूक लढवणार

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी ‘गोवा मायनिंग पीपल्स फ्रंट’ने  ‘मायनिंग डिपेंडंट फोरमच्या’ फलकाखाली निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.