पोलिसांच्या गोळीबारात आक्रमणकर्ता तरुण ठार
मॉस्को (रशिया) – रशियातील पर्म शहरातील पर्म विश्वविद्यालयात एका तरुणाने केलेल्या गोळीबारात ८ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण घायाळ झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात या आक्रमणकर्त्याचा मृत्यू झाला.
BREAKING: A shooting has been reported at a university in Perm, Russia, with students and teachers locking themselves into classrooms, state media says https://t.co/ys3YRnChBL
— CNN Breaking News (@cnnbrk) September 20, 2021
गोळीबारामुळे अनेक विद्यार्थ्यांनी विश्वविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली उड्या मारून पळण्याचा प्रयत्न केला. आक्रमणकर्त्याचे नाव टिमूर असून तो १८ वर्षांचा आहे. या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.