गुजरातमधील मुंद्रा बंदरावरील कंटेनरमधून ९ सहस्र कोटी रुपयांचे ३ सहस्र किलो हेरॉईन जप्त !

गुजरातमधील मुंद्रा बंदर

कर्णावती (गुजरात) – राज्यातील मुंद्रा बंदरामधील एका कंटेनरमधून महसूल गुप्तचर संचालनालयाने ३ सहस्र किलो हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याचे मूल्य ९ सहस्र कोटी रुपयांच्या आसपास आहे. या कारवाईनंतर या संचालनालयाकडून कर्णावती, देहली आणि चेन्नई येथे धाडी घालण्यात येत आहेत. हेरॉईन घेऊन जाणारे कंटेनर आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील एका आस्थापनाने आयात केले होते. या आस्थापनाने कंटेनरमध्ये ‘टॅल्कम पावडर’ असल्याचा बनाव केला होता.

अफगाणिस्तानच्या कंधार येथील ‘हसन हुसेन लिमिटेड’ या आस्थापनाने हे कंटेनर निर्यात केले होते. मुंद्रा बंदराची मालकी अदानी उद्योग समुहाकडे आहे.