आगामी निवडणुकांत भाजपच्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या !

केंद्रीय मंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘देशात आणि महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक बांधणी आदर्शवत् राहिली पाहिजे. निवडणुकीत उमेदवार कुणीही असला, तरी पक्षासाठी सर्वांनी काम केले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांचे दुसर्‍यांदा निलंबन !

विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह शब्दांत संवाद साधल्याचे प्रकरण

कोल्हापूर येथे नियमभंग करून २१ फुटी श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढल्याने माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

१९ सप्टेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाने ४ फूट श्री गणेशमूर्तीची अनुमती असतांना नियमभंग करून २१ फुटी श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढल्याने माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील तत्कालीन मंदिर व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना १ वर्षानंतर अटक !

श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील अलंकार आणि प्राचीन नाणी गहाळ झाल्याचे प्रकरण

वर्साेवा (मुंबई) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेली ५ मुले समुद्रात बुडली

१९ सप्टेंबरला अनंतचतुदर्शीच्या दिवशी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना अंधेरी येथील वर्सोवा समुद्रकिनारी रात्री ९ वाजता ५ मुले बुडली. त्यांतील २ मुलांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून उर्वरित ३ मुले अजून बेपत्ता आहेत.

सातारा येथे गुलाल उधळणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरुद्ध गुन्हा नोंद !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली होती. तरीही येथील मंडईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वाजत-गाजत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली.

किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमागे भाजपचे मोठे षड्यंत्र ! – हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री

मुश्रीफ पुढे म्हणाले, ‘‘माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असून मी किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुहानीचा दावा दाखल करणार आहे. ‘ब्रिक्स इंडिया’ आस्थापनाशी माझा आणि माझ्या जावयाचा काहीही संबंध नाही.’’

किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाई चुकीची ! – देवेंद्र फडणवीस

फडणवीस पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की, एखादी व्यक्ती भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करायला जाते आणि पोलीस त्याला अडवतात.

महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग यांच्याकडे १० सहस्र श्री गणेशमूर्तींचा अनोखा संग्रह !

सर्च शोधग्रामच्या संचालिका डॉ. राणी बंग यांची लहानपणापासून श्री गणेशावर असीम श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी त्यांनी प्रत्येक दगडात गणपतीला शोधण्याचा छंद जोपासला आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर गृहमंत्रालयाकडून कारवाई; मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

किरीट सोमय्या यांच्यावर १९ सप्टेंबर या दिवशी केलेली कारवाई ही गृहमंत्रालयाने केली असून यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही, असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी २० सप्टेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केला.