पिंपरी (पुणे) येथील २ ‘सिटी स्कॅन सेंटर’ने रुग्णाकडून घेतलेली अतिरिक्त रक्कम परत मिळवून देण्यात हिंदु जनजागृती समितीप्रणीत आरोग्य साहाय्य समितीला यश !

जनतेची अशा प्रकारे होणारी लूट रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेणे अपेक्षित आहे !

सातारा जिल्हा रुग्णालयात लसीच्या कूपन वाटपावरून गदारोळ !

लसीकरण केंद्राबाहेरील कर्मचारी तोंडे पाहून कूपन वाटप करत असल्याचे आरोप केले जात आहेत.

सैन्यशाहीचा निषेध !

आपल्याच नागरिकांच्या विरोधात बंदुका चालवणारी सैन्यशाही दिवसेंदिवस क्रूर होत आहे. तिला वेळीच धडा शिकवण्यासाठी संपूर्ण विश्वाने आवाज उठवल्यास हुकूमशाहीच्या जोखडातून मुक्त होऊन म्यानमारला मोकळा श्वास घेता येईल, हेच खरे !

आतापर्यंत २०८ जणांचा जामीन संमत, तर १८ आरोपींचा जामीन फेटाळला

पालघर जिल्ह्यात झालेले साधूंचे हत्याकांड प्रकरण

लाच घेतल्याप्रकरणी तलाठ्यासह एका व्यक्तीला अटक !

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागितल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रारीची पडताळणी करून पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मृत रुग्णावर दोन दिवस उपचार करून आर्थिक फसवणूक करणारे आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांना अटक !

‘मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची’ वृत्ती असणार्‍या अशा आधुनिक वैद्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई चौधरी यांना अटक !

‘६ जुलैला चौधरी यांची चौकशी करण्यात आली; मात्र या ते सहकार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली’, असे ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

गुन्हेगार महिलांचे वाढते प्रमाण चिंताजनक !

काही महिला गुन्हेगारांकडून बनावट (खोटी) कागदपत्रे दाखवून केली जाणारी फसवणूक, परस्पर घरे विकणे, आर्थिक अपहार असे प्रकार होतांनाही दिसत आहेत.

आईची हत्या करणारा आरोपी सुनील रामा कुचकुरवी याला मरेपर्यंत फाशी

समाजातील आसुरी वृत्ती बळावत चालल्याचे, हे उदाहरण आहे. यामध्ये पालट होण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

टाळ-मृदुंगाच्या निनादात रंगला संत सोपानदेवांचा पालखी प्रस्थान सोहळा !

६ ते १८ जुलै या कालावधीत पालखीचा मुक्काम समाधी मंदिरात सासवडलाच असेल. आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे १९ जुलै या दिवशी सरकारने दिलेल्या २ बसमधून ‘श्रीं’च्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतील.