४ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
शिरुर (जिल्हा पुणे) – येथील इस्लामपूर येथे गोमांस विक्री करणार्या ४ दुकानांवर शिरूर पोलिसांनी धाड टाकून २९२ किलो गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई निखिल रावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शौकत कुरेशी, हनिफ शेख, इसराल कुरेशी, मुजीफ कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे सर्व गोमांस एकूण ३५ सहस्र ४० रुपये किमतीचे आहे. पोलिसांनी हे गोमांस जप्त केले. तर मुजीफ कुरेशी हा या ठिकाणाहून पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला.
संपादकीय भूमिका :राजरोसपणे होणारी गोहत्या थांबवण्यासाठी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही आवश्यक ! |