मेळघाटात खासगी बस दरीत कोसळली !
अमरावती – अमरावतीहून धारणी येथे जाणार्या खासगी प्रवासी बसचालकाचे नियंत्रण सुटून ती पुलाचा कठडा तोडून दरीत कोसळली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू, तर २५ जण गंभीर घायाळ झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांनी तातडीने बचावकार्य चालू केले. घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणारा धर्मांध अटकेत
पनवेल – गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने पनवेलमधील करंजाडे भागातून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या धर्मांध दलालाला अटक केली. वेद अली खान उपाख्य राजू मंडल असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ३ महिला आणि बांगलादेशी अल्पवयीन मुलगी अशा ४ पीडितांची सुटका केली आहे. या प्रकरणात सहभागी अन्य २ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
संपादकीय भूमिका : गुन्हेगारीच्या सर्व क्षेत्रांत पुढे असणारे धर्मांध !
लोकलमधील बेवारस बॅगेत २० लाख रुपये !
डोंबिवली – आसनगाव येथून मुंबईला जाणार्या लोकलच्या डब्यात बेवारस बॅग आढळली. कल्याण रेल्वेस्थानकात गाडी येताच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तिची पहाणी केली असता तिच्यात २० लाख रुपयांची रोकड सापडली. बॅगेच्या मालकाचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत.
गरीब रथ एक्सप्रेसमध्ये शिरला साप !
मुंबई – जबलपूर ते मुंबई गरीब रथ एक्सप्रेस सिग्नलजवळ उभी असतांना शेजारच्या झाडावरून साप रेल्वेमध्ये आला. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा केला. काहींनी त्याच्यावर कांबळं टाकून त्याला रेल्वेतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला; परंतु कांबळं बाहेर गेले आणि साप आतच राहिला. यानंतर प्रवाशांना त्या डब्यातून दुसर्या डब्यात पाठवण्यात आले. रेल्वेचा तो डबा एक्स्प्रेसपासून वेगळा केल्यावर रेल्वे मार्गस्थ झाली.
विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू !
पुणे – श्री गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये ईद-ए-मिलाद आल्यामुळे पोलिसांनी उत्सव झाल्यावर मुसलमानांना जुलूस (मिरवणूक) काढण्याची अनुमती दिली होती. त्यामध्ये वडगावशेरी गावठाण येथील मिरवणुकीमध्ये विजेचा धक्का बसून अभय वाघमारे आणि जकरिया शेख या २ युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.