शिक्षण उपसंचालकांचे चंद्रपूरच्या शिक्षणाधिकार्यांना आदेश
चंद्रपूर – नांदा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव आणि मंडळाअंतर्गत संचलित श्री प्रभु रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले अनिल मुसळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक पदावरही कार्यरत आहेत. दोन्ही ठिकाणचे वेतन घेऊन त्यांनी सरकारची दिशाभूल केली. खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडून मुख्याध्यापक पद बळकावल्याचे चौकशीत उघडकीस आले. मुख्याध्यापक अनिल मुसळे यांची नियुक्ती रहित करण्याचा प्रस्ताव ७ दिवसांत सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी यांना दिला आहे. (एकाच वेळी दोन पदांवर कार्यरत राहून सरकारची फसणवूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)