
सासवड (पुणे), ८ जुलै – टाळ-मृदुंगाचा निनाद, निवडक दिंड्या, मोजके वारकरी यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात श्री संत सोपानदेवांच्या पादुका पालखीत ठेऊन ‘श्रीं’चा पालखी प्रस्थान सोहळा ६ जुलै या दिवशी दुपारी ४ वाजता सासवडला देऊळवाड्यात झाला. मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मंदिरात विसाव्याला थांबली. या वर्षीही गतवर्षीप्रमाणेच बसमधूनच निवडक वारकर्यांसमवेत श्री संत सोपानदेवांच्या पादुका घेऊन आषाढ वारी होईल.
६ ते १८ जुलै या कालावधीत पालखीचा मुक्काम समाधी मंदिरात सासवडलाच असेल. या दिवसात नित्य काकड आरती, भजन, हरिपाठ, कीर्तन, शेजारती आणि जागर मंदिरातच होतील. आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे १९ जुलै या दिवशी सरकारने दिलेल्या २ बसमधून ‘श्रीं’च्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतील.
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पाणीटंचाईची समस्या मांडतांना विषय भरकटल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक समोरासमोर
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
पुणे रेल्वेस्थानकाचा ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सिद्ध ! – श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !