पुलवामा येथे चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे ५ आतंकवादी ठार

१ सैनिक हुतात्मा

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील शासनकर्त्यांकडून देशाच्या एका छोट्याशा भागातील आतंकवादही संपवू न शकणे, हे त्यांना लज्जास्पद ! हा आतंकवाद संपवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

पुलवामा – येथील हांजिन राजपोरा भागात सुरक्षासैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’ या जिहादी आतंकवादी संघटनेचे ५ आतंकवादी ठार झाले. या आक्रमणात १ सैनिक हुतात्मा झाला आहे. ठार झालेल्या आतंकवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी आहे. हांजिन राजपोरा भागात काही आतंकवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. त्यानंतर सैनिकांनी या भागाला चोहोबाजूंनी घेरत आतंकवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. आतंकवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. त्यास सैनिकांनी सडेतोड प्रत्युत्तर देत ५ आतंकवाद्यांना ठार केले.