पुणे, २ जुलै – पायी वारीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील वारकर्यांना ३ जुलै या दिवशी आळंदी येथे येण्याचे आवाहन संतवीर बंडातात्या कराडकर यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना दिसता क्षणी कह्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या अटकेविषयी आळंदी आणि परिसरातील पोलिसांना पिंपरी चिंचवड आयुक्तालयातून बिनतारी संदेशाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. संतवीर बंडातात्या कराडकर आळंदी परिसरात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता.