मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे जाऊन दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत विधानपरिषदेत राज्यपालनियुक्त सदस्यांचा विषय मांडला होता. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

पाकचा आर्थिक जिहाद !

देशाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या या आर्थिक जिहादच्या विरोधात भारत आता काय कृतीशील भूमिका घेणार, हे पहाणे महत्त्वाचे आहे. हा निधी कसा जमा झाला ? तो जमा करणार्‍यांची पाळेमुळे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी शोधली आहेत का ? हे जनतेला कळले पाहिजे.

पनवेल येथील सिडकोने घेतलेले सेवा शुल्क महापालिका नागरिकांना परत करणार ! – महापालिका आयुक्तांचे आश्‍वासन

‘सिडको क्षेत्रातील नागरिकांकडून सिडकोने घेतलेले सेवा शुल्क परत करण्याच्या ठरावाची तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली.

डोंबिवली रेल्वेस्थानकात प्रवाशाचा भ्रमणभाष चोरणारा अटकेत !

वाढती गुन्हेगारी म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नसल्याचे लक्षण !

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस : पंचगंगेच्या पातळीत १७ फुटांनी वाढ !

कागल तालुक्यातील बाचणी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाळवा-बाचणी परिसरातील कोल्हापूरला जाणारी वाहतूक बंद झाली आहे.

चोख कामासाठी प्रशासनाला बाध्य करा !

जनहितासाठी कामे करणार्‍या नेतृत्वाला स्थानिक नागरिकांनी पाठिंबा देणेही आवश्यक आहे. सरकारी कामकाज पारदर्शक आणि प्रामाणिकपणे होण्यासह दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला बाध्य केले पाहिजे !

विरोबा मंदिरातील (जिल्हा सांगली) ४ मासांपूर्वी चोरून नेलेल्या देवतांच्या मूर्ती चोराने परत आणून दिल्या !

४ मासांपूर्वी बेडग येथील बिरोबा मंदिरातील पितळी घोडे, बकर्‍यांच्या मूर्ती, गाभार्‍यातील ९ किलो वजनाचा पितळी नंदी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.

उपाहारगृह चालू करायचे नाही, तर निदान आत्महत्या करायची तरी अनुमती द्या ?

कोरोनाच्या संसर्गाला केवळ व्यावसायिकच उत्तरदायी आहेत, असा समज करून प्रशासनाकडून सर्व नियमावली काढण्यात येते, असा आरोप येथील व्यावसायिक करत आहेत.

भारत ‘इस्लामी देश’ होण्यापूर्वी जागे व्हा !

आसाममध्ये वर्ष २०३८ पर्यंत हिंदु अल्पसंख्यांक, तर मुसलमान बहुसंख्यांक होतील, अशी भीती आसाममधील भाजपचे आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष जयंत मल्ला बरुआ यांनी व्यक्त केली आहे.

‘अयोध्याजी के श्रीराम मंदिर के बदनामी का षड्यंत्र !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या भूमीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे खोटे आरोप काही विघातक शक्तींकडून करण्यात येत आहेत.