पाकचा आर्थिक जिहाद !

देशाची स्वतःची भीक मागण्याची वेळ आली आहे, त्या शत्रूराष्ट्र पाकने भारताला कोरोना महामारीच्या काळात उद्भवलेल्या विलक्षण संकटात साहाय्य करण्यासाठी पुढे येणे, हेच अत्यंत हास्यास्पद होते; कारण पाक कुठल्याही अंगाने भारतासाठी साहाय्य करण्यास सक्षम नाही. अशा पाकमध्ये कोरोना महामारीच्या संकटात एक बिगर सरकारी संस्था भारताच्या नावाने उभी रहाते काय आणि जगभरातून कोट्यवधी रुपये गोळा करते काय, हे सारे उघडपणे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकचे भारताच्या संकटकाळाची संधी साधून केलेले आंतरराष्ट्रीय षड्यंत्र होते. मुळात सर्व बाजूंनी भिकेकंगाल झालेल्या पाकची कोरोनाच्या पहिल्या लाटेत इतकी वाट लागली होती की, त्याने देशातील जनतेला मरण्यासाठी सोडले; पण दळणवळण बंदी लागू केली नाही. भारतात प्रचंड प्रमाणात दुसरी लाट येऊन भारताची स्थिती दयनीय झाली; पण पाकला दुसर्‍या लाटेची यत्किंचितही झळ बसली नाही. या दोन्ही गोष्टी पाकला चीनची मोठी फूस असल्याचा संशय बळावणार्‍या आहेत. पाकची स्थिती इतकी बिकट आहे की, तो जनतेला वाचवणार्‍या लसीची निर्मितीही करू शकत नाही. असे असतांना स्वतःच्या देशाला साहाय्य करायचे सोडून तिथे शूत्रराष्ट्र भारताला साहाय्य करणारी संस्था उभी रहाते, हेच संशयास्पद आहे.

आर्थिक जिहाद !

युद्धभूमीत भारतासमोर उभा राहू न शकणारा पाक नेहमी या ना त्या कारणाने भारताला डिवचून त्याच्यावर कुरघोडी करतो. ‘हेल्प इंडिया ब्रीद’ नावाची बनावट (खोटी) सेवाभावी संस्था स्थापन करून कोरोनाच्या संकटकाळात गोळा केला जाणारा निधी हा सरळ आतंकवादी कारवायांसाठी वापरला जाण्याचा संशय ‘डिसइन्फो लॅब’ या संस्थेने व्यक्त केला आहे. हा सरळ सरळ मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार झाला. भारतात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असतांना पाकने ही संस्था अशा खोट्या नावाने उभी केली की, कुणालाही संशय येऊ नये. त्यामुळे भारत, अमेरिका आणि अन्य देश यांतील धनिकांनी भारत संकटात असल्याने त्याच्या प्रेमापोटी मोठे धन या संस्थेला अर्पण केले. त्या धनिकांनीही ही संस्था खरी आहे किंवा खोटी, नोंदणीकृत आहे का ? इत्यादी गोष्टींचा फारसा विचार केला नाही, असेच यावरून लक्षात येते. भारतात तेव्हा वेळच तशी आपत्काळाची होती. ऑक्सिजनअभावी आणि अन्य कारणे यांमुळे मृतांची संख्या वाढत होती. रुग्णांची प्रचंड आबाळ होत होती. त्याचा अपलाभ भारताला सतत पाण्यात पहाणार्‍या पाकी आतंकवाद्यांनी चांगलाच उठवला. इंटरनेटद्वारे उभारलेल्या या संस्थेमुळे कुणाला विशेष संशयही आला नसावा. आपले पितळ उघडे पडलेच, तर पैसे घेऊन पोबारा करता यावा आणि त्यासाठी लवकरात लवकर पैसे गोळा व्हावेत म्हणून चक्क या संस्थेने ‘शेवटचे काही दिवस’ अशी दिवसांची समयमर्यादा पैसे पाठवण्यासाठी घातली. इथे तरी संशय येण्यास जागा होती की, साहाय्य किंवा दान मागणारे कधी अशी समयमर्यादा घालतात का ? पण भारताच्या प्रेमापोटी दानशूरांनी दान दिले. पाकने इतके साळसूदपणे हे पैसे गोळा केले. हलाल प्रमाणपत्र आणि अन्य अनेक माध्यमे यांतून सध्या आतंकवाद्यांनी आर्थिक जिहाद पुकारला आहे. हा त्याच्याच एक भाग होता, असे म्हटले तर चूक नव्हे. हा जिहाद इतका सफाईदारपणे त्याने केला की, भारताच्या गुप्तचर संघटनांनाही त्याचा संशय आला नाही. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेलाही याचा संशय आला नाही कि त्यांना हे ठाऊक असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, हाही प्रश्न आहे. पाकमधील हिंदूंनीही धर्मबांधवांच्या प्रेमापोटी या संस्थेला पैसे दिले. भारतासाठी पैसे उभे करणारे अर्थात्च हिंदु, शीख किंवा जैन असे होते. भारतासारख्या राष्ट्राला साहाय्याला जातो, हे दाखवून त्याचा अवमान करणे, पैसे गोळा करून उलट ते आतंकवादाच्या माध्यमातून भारताच्या नाशासाठी वापरणे, हा आतंकवाद्यांचा एक सुनियोजित कट सध्या तरी यशस्वी झाला, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. पाकने मोठी लबाडी आणि हुशारी करून जनतेची सहानुभूती मिळवली आणि या पैशांच्या रूपाने भारताच्या विरोधात मोठा आर्थिक जिहाद उभारला अन् भारताला नामोहरम करून तो वरचढ ठरला !

(प्रतिकात्मक छायाचित्र) (सौजन्य : एएनआय/एपी)

राष्ट्रद्रोही अभिनेत्यांना जाब विचारा !

पाकच्या कुठल्याही गोष्टीवर जगातील कुठल्याही माणसाने विश्वास ठेवू नये, हेच पुन्हा पुन्हा सिद्ध करणारी ही घटना आहे; पण जे पाकप्रेमात आकंठ बुडालेले भारतातील अभिनेते-अभिनेत्री आहेत, त्यांना आता जनतेने आणि सरकारने जाब विचारण्याची वेळ आली आहे. एके काळी नावाने तरी भाजपमध्ये आणि आता काँग्रेसमध्ये असलेले शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी या तथाकथित संस्थेला पैसे दान देण्याचे आवाहन केले होते. भारतातील अभिनेत्रींचा प्रभाव पहाता अनेकांनी या संस्थेला पैसे दिलेले असू शकतात. त्यामुळे अशा पाकप्रेमी कलाकारांवर भारतातील देशप्रेमी जनतेने बहिष्कार घातला पाहिजे आणि सामाजिक माध्यमांतून त्यांना वैध मार्गाने प्रश्न विचारले गेले पाहिजेत. हे अभिनेते पाकला साहाय्य करून अशा प्रकारे अंग झटकू शकत नाहीत. हे कलाकार भारतियांच्या घामाच्या पैशानेच वर आलेले असतात, हे ते विसरतात; पण जनतेने हे विसरता कामा नये.

भारतासमोरील आव्हाने

देशाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या या आर्थिक जिहादच्या विरोधात भारत आता काय कृतीशील भूमिका घेणार, हे पहाणे महत्त्वाचे आहे. हा निधी कसा जमा झाला ? तो जमा करणार्‍यांची पाळेमुळे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी शोधली आहेत का ? हे जनतेला कळले पाहिजे. हा निधी आतंकवाद्यांपर्यंत पोचला आहे का ? तो काश्मीरपर्यंत आला आहे कि देशभर पसरला आहे ? हे शोधणेही भारतीय यंत्रणांसमोरची आव्हाने असतील. तो निधी भारताच्या विरोधात वापरला जाण्यापूर्वी त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे का, हे पहावे लागेल. अशा प्रकारे भारताला सतत डंख मारून दंश करणार्‍या पाकच्या नवनवीन क्लृप्त्या या न संपणार्‍या आहेत. त्यांचा अंत त्याच्यासमवेतच होईल, हे लक्षात घेतले पािहजे. त्यामुळे अशा आतंकवादी राष्ट्रांना जगाच्या नकाशावर स्थानच न देणे, हेच आपले ध्येय असले पाहिजे. सध्याच्या सरकारच्या कारकीर्दीत ते शक्य होऊ शकते आणि तशी त्यांची क्षमता आहे. फक्त सरकार त्यादृष्टीने विचार करणार का ? हा प्रश्न आहे.