नागपूर येथे ११ वर्षांपासून अवैधरित्या लपून रहाणार्‍या अफगाणी धर्मांधाला अटक !

नूर मोहम्मद (वय ३० वर्षे) असे त्याचे नाव असून तो तालिबानी समर्थक आहे. तो सामाजिक माध्यमांतून तालिबानी आतंकवाद्यांना संपर्क करत होता, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

देशात धर्माधिष्ठित राज्य निर्माण होण्यासाठी प्रतिदिन समाजाचे प्रबोधन करायला हवे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्मप्रेमींसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र शौर्यजागृती शिबिरा’ मध्ये विविध जिल्ह्यांतील ६३५ धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

नागपूर येथे आधुनिक वैद्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेला अटक !

शासकीय विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीची पत्नी शीतल इटनकर यांनी येथील आधुनिक वैद्य तुषार पांडे दाम्पत्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितली.

मुंबईतील हाऊसिंग सोसायटीमध्ये कोरोनावरील बोगस (खोट्या) लस देऊन लाखो रुपयांची लूट !

कांदिवली येथील हिरानंदानी इस्टेट सोसायटीमधील ३९० रहिवाशांना ३० मे या दिवशी ‘कोविशिल्ड’ ही कोरोनावरील लस देण्यात आली. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या वतीने लस देण्यासाठी एका दिवसाचे शिबिर आयोजित केले होते.

आषाढी वारी पायी व्हावी यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने भजन आंदोलन !

वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, तुकारामबीज, हनुमान जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सर्व उत्सव शासनाच्या सूचना स्वीकारून साजरे केले. कोरोना संसर्गामुळे कोणीही शासनाच्या विरोधात भूमिका न घेता आतापर्यंत सहकार्यच केले आहे.

हिंदु धर्मावरील आक्षेप खोडून काढण्यासाठी प्रत्येक हिंदूने वक्ता-प्रवक्ता होणे आवश्यक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात ‘ऑनलाईन वक्ता-प्रवक्ता शिबिरा’चे आयोजन !

… तर १-२ मासांत राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते ! – शासननियुक्त ‘टास्क फोर्स’

महाराष्ट्रात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १९ लाख, तर दुसर्‍या लाटेत ४० लाख रुग्णांची नोंद आहे. तिसर्‍या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या ८ लाखांपर्यंत जाऊ शकते.

दाखल्याअभावी शाळांना विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारता येणार नाही !

इयत्ता नववी किंवा दहावी या वर्गांत अन्य शाळांतून विद्यार्थी प्रवेशाची मागणी करत असल्यास अशा विद्यार्थ्यांना दाखल्याअभावी (टीसी) प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असा शासन निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी लागू केला आहे.

घरोघरी जाऊन लसीकरण करू नका ! – केंद्र सरकार

घरोघरी जाऊन लसीकरण करू नका, असा सर्वांना सल्ला आहे, असे केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणीच्या वेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेने केंद्र सरकारकडे घरोघरी जाऊन लसीकरणासाठी अनुमती मागितली होती.

रुग्णांवर उपचार करण्यास बंदी असूनही उपचार केल्याप्रकरणी ‘अ‍ॅपेक्स’ रुग्णालयातील ४ जणांना अटक !

कोरोनाच्या काळात असे प्रकार होणे, हे अत्यंत गंभीर असून प्रशासनाने अशा करणांमध्ये वेळीच लक्ष दिले असते, तर यातील अनेक अपप्रकार टाळता आले असते !