सांगली – जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १९ ते २६ मे या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेशांची कार्यवाही करण्यात येत आहे. यात ११ ते २२ मे या कालावधीत सकाळी ७ ते ११ या वेळेत घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना खरेदी करण्यास अनुमती देण्यात आली होती. यानंतर आता २३ मेपासून कृषी उत्पन बाजार समितीमधून किराणा साहित्याची विक्री २३ मेपासून बंद राहिल, असे आदेश सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. यापूर्वी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत किरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते यांना केवळ घरपोच सेवा देण्यास अनुमती देण्यात आली असून ती तशीच चालू रहाणार आहे.