तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची राष्ट्रपतींना पत्र लिहून मागणी
याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी का बोलत नाहीत ?
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे नवनिर्वाचित द्रमुक पक्षाच्या सरकारचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणी सर्व ७ दोषींची जन्मठेपेची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली आहे. ‘या दोषींनी गेली ३ दशके पुष्कळ त्रास सहन केला आहे. त्यांनी केलेल्या अपराधाची मोठी किंमत त्यांनी चुकवली आहे. त्यामुळे त्यांची शिक्षा माफ करण्यात यावी’, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या पत्रात म्हटले आहे. एस्. नलिनी, संथन, मुरुगन, ए.जी. पेरारीवलन, जयकुमार, रॉबर्ट पयास आणि पी रविचंद्रन् अशी या ७ दोषींची नावे आहेत. यातील नलिनी हिला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती; मात्र घटनेच्या कलम १६१ नुसार ती जन्मठेपेत पालटण्यात आली होती. तसेच अन्य तिघांचीही फाशी रहित करून जन्मठेप करण्यात आली होती.