बलात्काराचा सूड घेण्यासाठी पीडित विवाहितेने पतीसमवेत मिळून केली बलात्कार्‍याची हत्या !

बलात्कार पीडित महिला कायदा हातात घेऊन अशी कृती का करतात, याचा विचार करण्याची वेळ आली आहे !

(प्रतिकात्मक चित्र)

गिरीडीह (झारखंड)- येथे हबीबुल्लाह नावाच्या युवकाने एका विवाहितेवर बलात्कार केला. याचा सूड घेण्यासाठी या विवाहितेने तिच्या पतीच्या साहाय्याने हबीबुल्लाह याची हत्या केली. पोलिसांनी या दांपत्याला अटक केली आहे. महिलेने पतीला वाचवण्यासाठी अन्य २ युवकांची नावे घेतली आहेत; परंतु या युवकांवरील आरोपाचे पुरावे मिळाले नाहीत.

१६ मेच्या रात्री हबीबुल्लाह गावात एका विवाहामध्ये सहभागी होण्यासाठी  घराबाहेर पडला. रात्री उशीर झाला, तरी घरी परतला नाही, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या भ्रमणभाषवर संपर्क केला; परंतु तो बंद लागत होता. दुसर्‍या दिवशी शेतात हबीबुल्लाहचा मृतदेह सापडला. याचे अन्वेषण करतांना पोलिसांन या दांपत्याविषयी  संशयास्पद माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना कह्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा स्वीकारला. विवाहाच्या दिवशी महिलेने हबीबुल्लाह याला दूरभाष करून भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर महिलेने पतीसमवेत मिळून त्याची हत्या केली. त्याचा गळा कापण्यात आला, तसेच त्याच्या गुप्तांगावरही वार करण्यात आले.