‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घडामोडी

आंबोली घाटात काही ठिकाणी दरड कोसळली आणि झाडे उन्मळून पडली. त्यामुळे या घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

गोव्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ : प्रत्येक सप्ताहात अत्याचाराच्या ४ तक्रारींची नोंद

लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये अधिकाधिक गुन्हेगार हे एक तर पीडित महिलेचे नातेवाईक असतात किंवा पीडित महिलेच्या शेजारी रहाणारी तिच्या ओळखीची व्यक्ती असते.

गोव्यात दिवसभरात ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ३१४ नवीन रुग्ण

राज्यातील १० आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

चक्रीवादळामुळे गोव्यात कोरोना लसीकरण आणि वीजपुरवठा यांवर परिणाम !

वीजपुरवठा खंडित झाल्याने राज्यातील गृहअलगीकरणात असलेल्या सहस्रो कोरोनाबाधित रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागले.

औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) येथे धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण !

धर्मांधांपासून स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण काय करणार ? अशा धर्मांधांना ताळ्यावर आणण्यासाठी पोलिसांना अधिकार द्या !

श्रीक्षेत्र पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील थोर संत प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा देहत्याग

१६ मे या दिवशी सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी त्यांच्या इच्छेनुसार येथील प.पू. राऊळ महाराज समाधी मंदिर परिसरात त्यांना समाधीस्त करण्यात आले.

अखंड शिष्यभावात रहाणारे, तसेच भक्तांवर कृपेचा वर्षाव करणारे पिंगुळी, कुडाळ येथील थोर संत प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील थोर संत प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांनी १६ मे २०२१ या दिवशी देहत्याग केला. अध्यात्मातील त्यांचा अधिकार मोठा; मात्र ते शेवटपर्यंत स्वतःला ‘मी प.पू. राऊळ महाराजांचा शिष्य’ अशीच स्वतःची ओळख सांगत.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव ठेवण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे.