कोरोनाच्या संसर्गात निष्काळजीपणा न करता वेळेवर औषधोपचार करून प्राणरक्षणासाठी योग्य क्रियमाण वापरा !

कोरोनारूपी आपत्काळासाठी मार्गदर्शक सदर ! साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती ! भारतात मार्च २०२० पासून वैश्विक महामारी असलेल्या ‘कोविड’ने थैमान घातले आहे. मागील वर्षभरात याचा संसर्ग पसरण्यास रुग्णांच्या दृष्टीने पुढील दोन प्रमुख कारणे असल्याचे लक्षात येते. १. सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, समारंभामध्ये सहभागी न होणे इत्यादी मूलभूत गोष्टी अनेक वेळा माध्यमांतून सांगूनही व्यक्तीचे गांभीर्य … Read more

पत्रकारांच्या नावाने खंडणी वसूल करणार्‍या तोतया पत्रकाराला अटक !

हा तोतया पत्रकार नवी मुंबई काँग्रेस पदाधिकारी असून नवी मुंबई महापालिकेचा कंत्राटी स्वच्छता कामगार आहे.

‘द वीक’ला ‘कीक’ !

क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लेख प्रसिद्ध केल्याप्रकरणी ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकाने नुकतीच जाहीर लेखी क्षमायाचना केली आहे. ‘द वीक’च्या साप्ताहिकामध्ये ‘लॅम्ब लायनाइस्ड’ या मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध केला होता.

भारतभरातील मंदिरांत श्रद्धाहीनांना कदापि प्रवेश मिळू नये ! – कृतिका खत्री, सनातन संस्था

मंदिरात जातांना ‘साक्षात् भगवंताला भेटण्यासाठी जात आहे’, असा श्रद्धावान हिंदूंचा भाव असतो. या श्रद्धेने आणि भावाने जेव्हा हिंदू मंदिरात जातात, तेव्हा त्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळतो अन् त्यांचे दु:ख दूर होऊन त्यांना चैतन्याची, तसेच आनंदाची अनुभूती येते.

हिंगोली येथे ३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘शुभकल्याण मल्टीस्टेट क्रेडीट पतसंस्थे’च्या संचालकांना अटक

धाराशिव जिल्ह्यातील हावरगाव येथील ‘शुभकल्याण मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट पतसंस्थे’च्या माध्यमातून ११ संचालकांनी ठेवीदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवले.

गोमेकॉमध्ये आणखी ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दावा केला आहे की, हे मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे होत नसून रुग्ण गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती झाल्यावर उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू होत आहे. गोव्यामध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे, असा दावाही त्यांनी केला.

हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

मंदिर प्रशासनाच्या निर्णयांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा हिंदूंना अधिकार आहे. न्यायालयातही योग्य न्याय मिळाला नाही, तर हिंदू मंदिरांच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी करू शकतात.

कठोर निर्बंधांमधील दुजाभाव !

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर (सोलापूर) येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. लाखो वारकरी आणि भाविक अत्यंत श्रद्धेने एकत्रित येतात; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने घातलेल्या कठोर निर्बंधामुळे संपूर्ण वर्षभरात केवळ आषाढीच काय, तर अन्य कोणतीही यात्रा भरली नाही.

आद्यशंकराचार्य यांनी केलेले कार्य

अराजकाच्या काळात वैदिक धर्माला केवळ शाब्दिक पंडिताची नव्हे, तर क्रियाशील पंडिताची आवश्यकता होती. ज्याचे आचरण शुद्ध असेल, ज्याची बुद्धी सखोल आणि वाणी पवित्र असेल, भगवत्पूज्यपाद आद्यशंकराचार्य तशा महापुरुषाच्या रूपाने अवतरले.

युरोपमधील ३० पैकी २० देशांतील दळणवळण बंदी टप्प्याटप्याने उठण्याची शक्यता !

युरोपमधील विविध देशांत लसीकरणाचा वेग वाढत असल्याने कोरोना महामारी पसरण्याचा वेग मंदावू लागला आहे. अनेक देशांनी प्रवासावरील बंदी हटवली आहे. १७ मेपासून ब्रिटनमध्ये दळणवळण बंदी उठवली जाऊ शकते.