औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) येथे धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण !

  • आक्रमणात ७ पोलीस घायाळ

  • दगडफेक करणारे ५ धर्मांध कह्यात !

  • पोलिसांकडून १५० धर्मांधांवर गुन्हे नोंद !

  • धर्मांधांपासून स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण काय करणार ? अशा धर्मांधांना ताळ्यावर आणण्यासाठी पोलिसांना अधिकार द्या !
  • या घटनेविषयी सर्वधर्मसमभाववाले काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
  • कायदा हातात घेण्यासाठी धर्मांध संधी शोधत असतात आणि आक्रमण करण्यासाठी त्यांनी पूर्वसिद्धता केलेली असते, हे हिंगोली येथे पोलिसांवर झालेल्या आक्रमणाच्या घटनेतून दिसून येते !

हिंगोली – चोरीला गेलेल्या भ्रमणभाषवरून वारंवार दूरभाष करून शिवीगाळ केली जात असल्याच्या तक्रारीवर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, असा आरोप करत धर्मांधांनी आैंढा पोलीस ठाण्यावर दगडफेक करून आक्रमण केले. ही घटना १५ मे या दिवशी दुपारी १२ वाजता घडली. या वेळी स्वतःचे रक्षण करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेत पोलीस उपनिरीक्षकासह ७ पोलीस कर्मचारी घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी १५० धर्मांधांवर गुन्हे नोंदवले असून ५ धर्मांधांना कह्यात घेतले आहे.

१. औंढा नागनाथ येथील मोजीद सय्यद रफीक या तरुणाचा भ्रमणभाष १२ मे या दिवशी हरवला होता. दुसर्‍या दिवशी तो पूर्णपणे बंद होता; मात्र १४ मे या दिवशी भ्रमणभाष चालू झाल्यानंतर मोजीद याने त्यावर संपर्क साधून भ्रमणभाष देण्याची मागणी केली; मात्र समोरील व्यक्तीने त्याला अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली.

२. यानंतर या संभाषणाची ध्वनीफीत प्रसारित झाली. त्यानंतर १४ मेच्या मध्यरात्री मोजीद याने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर शोधमोहीम चालू केली.

३. पोलिसांकडून ‘हा क्रमांक नेमका कुणाचा आहे ? कशामुळे हा प्रकार घडतो आहे ?’, याविषयीची चौकशी चालू होती; मात्र हा क्रमांक बंद असल्याने चौकशीत अडचणी येत होत्या.

४. रमझान ईद झाल्यानंतर अनुमाने १५० हून अधिक धर्मांधांचा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला. या वेळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे यांच्यासह पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला.

५. धर्मांधांच्या जमावाने ‘या प्रकरणाची चौकशी का होत नाही ?’, असे उद्दामपणे विचारत पोलीस ठाण्यावर दगडफेक चालू केली. या वेळी धर्मांध पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांनी २ वेळा हवेत गोळीबार केला. त्यानंतर जमाव पांगला.