कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव ठेवण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. याचसमवेत लेखात उल्लेख केलेली रुग्णालये आणि आधुनिक वैद्य यांची नावे छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक

रुग्ण कोरोनाबाधित झाल्याचे निदान होऊनही त्याच्यावरील पुढील उपायांच्या दृष्टीने तत्परतेने पावले उचलली न जाणे आणि आरोग्य विभागाचा भोंगळ कारभारच समोर येणे

‘१४ एप्रिल या दिवशी डोंबिवली पूर्वेला मी अँटिजेनची चाचणी करण्यासाठी गेलो. माझी चाचणी सकारात्मक आली. त्यानंतर कुटुंबातील इतरांचीही चाचणी करून घेण्यास मला सांगण्यात आले. माझा मुलगा संदेश आणि पत्नी सौ. शीतल यांची चाचणी केल्यावर त्यांचे अहवाल नकारात्मक आले. त्यानंतर त्या दोघांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करावी लागणार असल्याचे चाचणी तज्ञांनी सांगितल्यावर तीही केली; पण सुट्ट्यांचा कालावधी असल्याने अहवाल मिळण्यास वेळ लागणार होता; पण तो मिळालाच नव्हता.

मी कोरोनाबाधित असल्याने मला एका ठिकाणी चौकशी करण्यास सांगितले. तेथे चौकशी केली असता ‘दुपारी ४ ते ५ या वेळेत तुम्हाला रुग्णवाहिका नेण्यासाठी येईल’, असे सांगण्यात आले. मी सर्व सिद्धता करून वाट पहात होतो. बराच काळ प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका न आल्याने मी पुन्हा चौकशी केली, तेव्हा मला सांगण्यात आले की, आज रुग्णवाहिका उपलब्ध नाही. ती उद्या येईल. मी संबंधितांना विचारले, ‘‘उद्याही असंच झाले तर ?’’ तेव्हा त्यांनी त्यांचा गृह विलगीकरणाचा (Home quarantine) अर्ज दिला. त्यावर स्वाक्षरी, शिक्का आणि आधुनिक वैद्यांच्या औषधोपचारांचा कागद त्याला जोडून दिला. शेवटी मला घरीच विलगीकरणात रहावे लागले.’  – श्री. श्रीराम रणभोर, डोंबिवली (पू.)

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती
पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]