युद्धाची सिद्धता वाढवण्याचे चीनच्या राष्ट्रपतींचे सैन्याला आवाहन !

शी जिनपिंग यांच्या अशा आवाहनामुळे  येत्या १-२ वर्षांत जगाला तिसर्‍या महायुद्धाला सामोरे जावे लागल्यास आश्‍चर्य वाटू नये ! हे लक्षात घेता विशेषतः भारतीय सैन्याने आणि जनतेने युद्धसज्ज रहाण्याची आवश्यकता आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! 

वाझे यांचे गुन्हे शाखेतून स्थानांतर करणार ! – गृहमंत्री

सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गदारोळामुळे जनतेच्या पैशांतून चालणार्‍या सभागृहाचा वेळ वाया घालवणे कितपत योग्य ? अशांकडून जनहितार्थ कार्याची अपेक्षा कशी करता येईल ?

‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकी संस्थेकडून भारताच्या नकाशाचे विकृतीकरण

हिंदु जनजागृती समितीची भारत सरकारकडे कारवाईची मागणी ! मुळात कोणत्याही संघटनेला अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारनेच स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !

चिनी सैन्य अद्यापही भारतासमवेतच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील मोक्याच्या ठिकाणावर कायम ! – अमेरिकेचे सैन्य कमांडर अ‍ॅडमिरल फिलिप डेव्हिडसन

दोन्ही देशांनी सैन्य मागे घेणे चालू केलेले असतांना अमेरिकेकडून अशी माहिती मिळते. याचा अर्थ भारतीय जनतेपासून खरी माहिती लपवून ठेवली जात आहे ! भारतीय सैन्याने किंवा संरक्षण मंत्रालयाने याविषयी जनतेला योग्य माहिती दिली पाहिजे !

विरोधकांनी तपासाला दिशा देण्याचे काम करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

सचिन वाझे काही वर्षांपूर्वी शिवसेनेत होते; मात्र त्यांनी सदस्यत्वाचे नूतनीकरण केले नाही. सध्या त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. सचिन वाझे हा ओसामा बिन लादेन असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.

अंबानींना ‘हेलिपॅड’ची अनुमती मिळण्यासाठी भाजपनेच स्फोटकांच्या वाहनाचे प्रकरण घडवून आणले  ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

महत्त्वाच्या सूत्रावर चर्चा होऊ नये, यासाठी भाजपनेच या सूत्रावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री

तीरथ सिंह रावत यांनी १० मार्च या दिवशी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदावरून भाजपकडून हटवण्यात आल्यानंतर तीरथ रावत यांची सकाळी विधीमंडळ सदस्यांकडून निवड करण्यात आल्यावर सायंकाळी त्यांचा शपथविधी करण्यात आला.

पाकव्याप्त काश्मीरवर पाकचे अवैध नियंत्रण !

युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे निर्वासित अध्यक्ष शौकत अली काश्मिरी यांनी पाकला फटकारले !

मेगन मर्केल यांच्या आरोपांवर कुटुंब खासगीत चर्चा करील ! – ब्रिटीश राजघराणे 

ब्रिटीश राजघराण्याची धाकटी सून मेगन मार्केल हिने एका मुलाखतीमध्ये राजघराण्याविषयी केलेल्या गौप्यस्फोटानंतर त्याला ब्रिटनची राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी उत्तर दिले असून प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्याविषयी चिंता आणि सहानुभूती व्यक्त करत ‘कुटुंब खासगीत यासंबंधी चर्चा करील’ असे म्हटले आहे.

ब्रिटीश सूनबाईंची कथा !

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या नात सूनबाई मेगन मर्केल यांनी ओपरा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत ब्रिटनच्या राजघराण्यात वावरतांना त्यांना आलेल्या वाईट अनुभवांविषयी गौप्यस्फोट केले.