मुंबई, १० मार्च (वार्ता.) – सचिन वाझे काही वर्षांपूर्वी शिवसेनेत होते; मात्र त्यांनी सदस्यत्वाचे नूतनीकरण केले नाही. सध्या त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. सचिन वाझे हा ओसामा बिन लादेन असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. आधी चारित्र्यहनन करायचे, मग अन्वेषण करायचे का ? ‘आधी फाशी आणि नंतर तपास’, अशी विरोधकांची भूमिका आहे का ?
(सौजन्य : Mumbai Tak)
मनसुख हिरेन मृत्यूच्या प्रकरणी अन्वेषण चालू आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. विरोधकांकडे कोणते पुरावे असल्यास त्यांनी द्यावेत; मात्र या तपासाला दिशा देण्याचे काम विरोधकांनी करू नये, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.