चिनी सैन्य अद्यापही भारतासमवेतच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील मोक्याच्या ठिकाणावर कायम ! – अमेरिकेचे सैन्य कमांडर अ‍ॅडमिरल फिलिप डेव्हिडसन

दोन्ही देशांनी सैन्य मागे घेणे चालू केलेले असतांना अमेरिकेकडून अशी माहिती मिळते. याचा अर्थ भारतीय जनतेपासून खरी माहिती लपवून ठेवली जात आहे ! भारतीय सैन्याने किंवा संरक्षण मंत्रालयाने याविषयी जनतेला योग्य माहिती दिली पाहिजे !

अ‍ॅडमिरल फिलिप डेव्हिडसन

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील ज्या भागावर नियंत्रण मिळवले होते, तेथून भारताच्या सैन्यासमवेत झालेल्या संघर्षानंतरही चीनचे सैन्य अद्यापही मोक्याच्या ठिकाणावरून माघारी गेलेले नाही, अशी माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटॉगॉनचे वरिष्ठ सैन्य कमांडर अ‍ॅडमिरल फिलिप एस्. डेव्हिडसन यांनी दिली आहे.