ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

हिंदूंनो, शिवाच्या उपासनेविषयी धर्मशिक्षण जाणून घ्या !

शिवाच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र यांविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे, ही शिवभक्तांसाठी काळानुसार समष्टी साधना आहे.  

भगवंताशी अनुसंधान

‘मी हे उद्या करीन’ आणि ‘भगवंता, उद्या हे माझ्याकडून करवून घे’ या दोन्हींत भेद आहे. यासाठी ‘हे भगवंता, उद्या आपल्याला हे करावयाचे आहे आणि ते तू माझ्याकडून करवून घे’, अशी प्रार्थना करावी. अनुसंधानाने सामर्थ्य निर्माण होते.’