पाकच्या सिंधमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांधर आणि विवाह !

अशा घटना रोखण्यासाठी कुणीही काही करत नाही, हे लक्षात घ्या !

गुन्हे अन्वेषण विभागाने उच्चभ्रू लोकांचा सहभाग असलेले वेश्याव्यवसाय रॅकेट उघडकीस आणले

गुन्हे अन्वेषण विभागाने पेडणे तालुक्यातील मोरजी येथे छापा टाकून उच्चभ्रू लोकांचा सहभाग असलेले वेश्याव्यवसाय रॅकेट उघडकीस आणले आहे.

गोव्यातील अमली पदार्थ पुरवठ्याची साखळी मोडून काढू ! – समीर वानखेडे, विभागीय संचालक, ‘एन्.सी.बी.’

गोव्यातील अमली पदार्थ पुरवठ्याची साखळी मोडून काढण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एन्.सी.बी.’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलतांना दिली.

मगोपने प्रविष्ट केलेल्या २ पैकी एक याचिका मागे घेतली

आमदार अपात्रता प्रकरण पणजी – सध्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभु पाऊसकर यांनी मगोपशी बंडखोरी करून भाजपात प्रवेश केला. या पार्श्‍वभूमीवर मगोपने गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे २ अपात्रता याचिका प्रविष्ट केलेल्या दोन्हीही याचिका त्याच मंत्र्यांच्या विरोधात आणि एकाच स्वरूपाच्या होण्याची शक्यता असल्याने यामधील एक याचिका मगोपने १० मार्च या दिवशी … Read more

पी.एफ्.आय.च्या सक्रीय कार्यकर्त्याची पत्नी मुरगाव पालिका निवडणुकीत उमेदवार : मतदारांनी सावध रहावे !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या आतंकवादाशी निगडित संघटनेचे सक्रीय कार्यकर्ते रियाझ काद्री यांची पत्नी समीना रियाझ काद्री या मुरगाव नगरपालिकेच्या प्रभाग १० मध्ये उमेदवार आहेत. पालिका निवडणुकीत मतदारांनी सतर्कता बाळगून आतंकवादी संघटनेचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला आपले मत देऊ नये, असे आवाहन ‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी ‘फेसबूक’च्या माध्यमातून केले आहे.

इन्सुली येथे अनधिकृतपणे वाळूची वाहतूक करणार्‍या ४ डंपरवर महसूल विभागाची कारवाई

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे महसूल विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत अनधिकृरित्या वाळूची वाहतूक करणारे ४ डंपर कह्यात घेतले.

पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात शिवशक्ती यागास प्रारंभ

प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा ७६ वा वाढदिवस आणि त्यांच्या विवाहाचा ५० वा वाढदिवस, तसेच येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन अन् महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात ‘शिवशक्ती यागा’चे आयोजन करण्यात आले आहे.

गुटखा विक्री केल्याच्या प्रकरणी कुडाळ येथील तिघांना आणि दोडामार्ग येथील तिघांना पोलीस कोठडी

गुटखा विक्री केल्याच्या प्रकरणी अन्न सुरक्षा दलाच्या पथकाने कुडाळ आणि दोडामार्ग येथे कारवाई केली.

कोटीशः प्रणाम !

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या चरणी कोटीशः प्रणाम !