कर्नाटकमध्ये होणार्‍या गोहत्या बंदी कायद्याची गोव्यातील गोमांस भक्षकांनी घेतली धास्ती !

कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यासाठी प्रखर गोभक्त तथा गोवंशियांच्या रक्षणासाठी झटणारे भाजपचे नूतन गोवा प्रभारी आणि कर्नाटकमधील चिक्कमंगळुरूचे आमदार सी.टी. रवि यांचा मोलाचा हातभार आहे.

हिंदु मुलींचे दलाल !

मोदी सरकारने या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता हिंदु मुलींची अब्रू वाचवणारा, त्यांची दलाली रोखणारा आणि प्राण वाचवणारा कायदा येण्यासाठी राज्यघटनेत आवश्यक ते पालट करावेत, अशी तमाम हिंदूंची अपेक्षा आहे !

भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात भाजपचा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना घेराव

आज शासकीय कर्मचार्‍यांना सहस्रो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत वेतन मिळते. असे असतांना वैद्यकीय दाखले आणि शस्त्रक्रिया यांसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील, तर ते सर्वथा लज्जास्पद आहे !

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या राजकारण्यांविरुद्ध कारवाई न होणे, ही लोकशाहीची शोकांतिका !

‘ही सर्व परिस्थिती पहाता हिंदु राष्ट्र, म्हणजे रामराज्य स्थापित व्हावे आणि धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था यावी’, असे आम्हा जनतेला वाटते. त्रिकालज्ञानी संतांच्या सुवचनांप्रमाणे, तो सुदिन फार दूर नाही, ही श्रद्धा असून तो आमचा निर्धार आहे.’

शिरोडा येथे फोंडा कीर्तन विद्यालयाचा आज चक्रीकीर्तन कार्यक्रम

गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा आणि शांताप्रसाद अद्वैतानंद न्यास शिरोडा यांच्या वतीने २२ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता शांताप्रसाद अद्वैतानंद सभागृह, चिकनगाळ, शिरोडा येथे चक्रीकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

साधकांनो, तुम्ही पाठवलेले लिखाण जागेअभावी प्रसिद्ध करता येत नसल्याने क्षमाप्रार्थी आहोत !

साधक लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात. आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल.

‘एन् ९५’ मास्क वापरण्यास अयोग्य असल्याचे ५ मासांनंतर आरोग्य खात्याच्या लक्षात येणे दुर्दैवी !

‘गोव्यात ‘एन् ९५’ मास्क वापरण्यास अनुमती देण्यात येणार नाही’, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘यासंबंधीचा आदेश देण्यात आला आहे.

हे भारताला स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांनी लज्जास्पद !

‘भारतीय सैन्यदलातील ८६ टक्के सैन्यउपकरणे आणि शस्त्रास्त्रे ही रशियन बनावटीची आहेत, अशी माहिती अमेरिकेतील ‘स्टिम्सन सेंटर’च्या अहवालात देण्यात आली आहे.

भारतीय राजकारणी ब्रिटीश पंतप्रधानांचा आदर्श घेतील का ?

‘ब्रिटनकडून भारताने लोकशाही आयात केली; परंतु त्यांची आदर्श तत्त्वे मात्र उंबरठ्याबाहेरच ठेवली.

कोकण रेल्वेमार्गावर हुंबरठ येथे रेल्वेची धडक बसून महिलेचा मृत्यू

कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्‍या गाडीची धडक बसून तालुक्यातील बौद्धवाडी, हुंबरठ येथील रेल्वेमार्गावर २१ नोव्हेंबरला सकाळी एका महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने महिलेची ओळख पटलेली नाही.