कोल्हापूर येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभ्यंगस्नान

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे दीपावली पाडव्याच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभ्यंगस्नान घालण्यात आले.

कोटी कोटी प्रणाम !

• नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील प.पू. काणे महाराज यांची आज पुण्यतिथी
• अमेरिका येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांचा आज वाढदिवस

यंदा दिवाळीत चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा

चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा – भारतियांनी ठरवले, तर चीनला धडा शिकवता येऊ शकतो. आता भारतियांनी यात सातत्य राखत चीनची एकही वस्तू विकत घेणार नाही आणि विकणारही नाही, असे ठरवले पाहिजे !

फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍या धर्मांध विद्यार्थ्यास अटक

महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्राचे प्रकरण : शाळेत शिकतांनाही शिरच्छेदासारख्या धमक्या देणारे धर्मांध कधीतरी शांतीचे पाईक होऊ शकतात का ? अशा कट्टरतावादाच्या विरोधात आता संपूर्ण जगाने एकत्र आले पाहिजे !

कानपूर येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदू, हिंदुत्वनिष्ठ, साधू आणि संत यांच्या सर्वाधिक हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने येथे धर्मांधांवर वचक निर्माण करावा, असे हिंदूंना वाटते !

दिवाळीला पहाटे फटाके फोडण्याला काँग्रेसचे माजी खासदार शाहिद सिद्दीकी यांचा आक्षेप !

‘वर्षातील २-३ दिवस फटाके फोडल्यावर त्याचा त्रास होतो’, असे म्हणणार्‍यांना  स्वत:च्या अजानचा दिवसातून ५ वेळा असा वर्षांतील प्रत्येक दिवस त्रास सहन करणार्‍यांविषयी सहानुभूती का वाटत नाही ?

कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासून भाविक रांगेत

तब्बल ८ मासांनी मंदिरे उघडल्याचा अपार उत्साह भाविकांमध्ये दिसून येत आहे.

पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा आज सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी

कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७ नोव्हेंबर २०२०) या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे आजी यांचा सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी आहे. त्यानिमित्ताने त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.