हिंदुत्व म्हणजेच ईश्‍वराच्या अनुसंधानात केलेले कर्म !

‘नुसत्या हिंदुत्वाला काही अर्थ नाही. तेथे धर्म असायला हवा. ईश्‍वरी अधिष्ठानाविना धर्म रुजत नाही. हिंदुत्व म्हणजेच धर्माचरण, म्हणजेच ईश्‍वराच्या अनुसंधानात केलेले कर्म.

स्वभावदोष-निर्मूलनाच्या दृष्टीकोनातून धर्मपालनाचे महत्त्व

षड्रिपू हे नैसर्गिक असल्यामुळे त्यांचे निर्मूलन करणे शक्य नसले, तरी समाजव्यवस्था उत्तम रहावी, यासाठी ते धार्मिक आणि नैतिक संस्कारांनी आत्मनियंत्रणात ठेवता येतात. नैतिक मूल्ये आणि धर्म यांचे पालन केल्यामुळे समाजातील सर्वच घटकांमधील षड्रिपू नियंत्रित रहातात. त्यामुळे दोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे शक्य होते.

हिंदूंनो, धर्माचरणासाठी हे कराच !

‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ  धर्माचरणात आहे. दैनंदिन धार्मिक कृती, उदा. पूजा-अर्चा,  सण आणि उत्सव हे शास्त्र समजून घेऊन करणे, तसेच कुलाचार अन् कुलपरंपरा सांभाळणे, यालाच  ‘धर्माचरण’ असे म्हणतात.

हिंदु स्त्रियांनो, स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून स्वतःचे रक्षण स्वतःच करा !

सुशिक्षित मुलींच्या ‘तोकडे कपडे घालणे आणि पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करणे हेच स्वातंत्र्य अन् प्रगती आहे’, अशी विचारसरणी बलात्कारासारख्या घटना घडण्यासाठी कारणीभूत असते. हिंदूंनी धर्माचरण केले आणि स्त्रियांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले, तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत.

श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धेमुळे इतिहासाची शिक्षिका सांगत असलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचे तिला धैर्याने सांगणारा कु. संस्कार सभरवाल (वय १४ वर्षे) !

‘रामायण आणि हनुमान यांविषयी वर्गात चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. हे लक्ष्यात आल्यावर श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धेमुळे इतिहासाची शिक्षिका सांगत असलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचे तिला धैर्याने सांगणारा कु. संस्कार सभरवाल !

धर्माचरणाची आदर्श उदाहरणे

उत्तरप्रदेश येथील धर्माभिमानी कु. शुभम् विश्‍वकर्मा (वय १८ वर्षे) याने कपाळाला टिळा लावून शाळेत जाण्यासाठी शिक्षकांशी केलेला संघर्ष !

देवघरात देवतांची मांडणी कशी करावी, याविषयीचे धर्मशास्त्र

देव्हार्‍यात देवतांची मांडणी करतांना ती शंकूच्या आकारात करावी. पूजा करणार्‍या भक्ताच्या समोर मध्यभागी श्री गणपति ही देवता उजव्या हाताला स्त्रीदेवता ठेवाव्यात आणि डाव्या हाताला पुरुषदेवता ठेवाव्यात.

हिंदूंनो, ईश्‍वरी चैतन्य अधिकाधिक मिळण्यासाठी धर्माचरण करा !

मानवाचे शरीर, विशेषतः कपाळ आणि भुवया यांमधील स्थान विद्युत् चुंबकीय लहरींच्या रूपात ऊर्जा उत्पन्न करते. कपाळावर कुंकू किंवा टिळा लावल्याने कपाळ थंड राहून व्यक्तीचे अनिष्ट लहरींपासून रक्षण होते.

धर्माचरणाची अपरिहार्यता अधोरेखित करणार्‍या घटना

धर्माचरण नसल्याने आज हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयीचा अभिमानच उरलेला नाही. त्यामुळे ते अन्य धर्मियांप्रमाणे अनुसरण करू लागतात. स्वतःच स्वतःच्या अधोगतीस कारणीभूत ठरतात.

हिंदूंच्या धर्मशिक्षणाविषयीचे अज्ञान दर्शवणार्‍या कृती

आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंच्या जीवनाला ताळतंत्र राहिलेले नाही. धर्माचा पाया नसल्याने त्यांचे जीवन आधारहीन झालेले आहे. धर्मशिक्षणाअभावी भरकटलेल्या हिंदु समाजाकडून होणार्‍या अयोग्य प्रकारच्या कृती पुढे दिल्या आहेत.